विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
 आगामी  निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, विधानसभेच्या  पार्श्वभूमीवर  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे . काही सर्वसाधारण  जागांवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे प्रकाश आंबेडकर  यांनी जाहीर केले आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत  ते बोलत होते. 

तसेच,आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण  जागांवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र आला आहे. यापुढील काळात त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे. या दृष्टीने महाराष्ट्रात तीन ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील केनगाव येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी, मनमाड येथे 2 ऑक्टोबर रोजी आणि नागपूर या ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान,  विधानसभेच्या 24 मतदारसंघांमध्ये 22 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. पण 14 टक्क्यांपासून ते 29.9 टक्केपर्यंत लोकसंख्या असलेले 20 मतदारसंघ आहेत. आदिवासी भाग हा प्रदूषण विरहीत भाग आहे आणि या भागाला नेहमीच विकासाच्या नावावर लक्ष्य केले जाते. कुठेही अभयारण्य बांधायचे असेल किंवा नवनिर्माण करायचे असेल, तर सर्वांची नजर आदिवासी क्षेत्रावर पडते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group