मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर पहाटे रुग्णालयात दाखल , समोर आली
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर पहाटे रुग्णालयात दाखल , समोर आली "ही" महत्वाची माहिती
img
DB
पुणे :  राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज (गुरुवारी,३१ ऑक्टोबरला) पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.

हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील ३-५ दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group