राज ठाकरे यांच्या
राज ठाकरे यांच्या "त्या" विधानाचा प्रकाश आंबेडकर यांनी घेतला समाचार
img
दैनिक भ्रमर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा लावून धरला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांची ही मागणी समाज दुभंगणारी आहे. देशविरोधी आहे. त्यामुळे त्यांना थेट टाडा, पोटा आणि नॅशनल सेक्युरिटी ॲक्ट (रासुका) लावून आत टाकलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची यात्रा आज अमरावतीत आली होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढत आहे. सात ते आठ महापालिका निर्माण होतील एवढी लोकसंख्या ठाण्यात वाढत आहे. त्यामुळे आपला पैसा इतरांवर खर्च होत आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा >>> राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार?

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ही मागणी केली. अशा व्यक्तींना सरळ सरळ टाडा, पोटा लावला पाहिजे. हे विधान म्हणजे ब्रेकअप द नेशन आहे. सरकारने मागे पुढे न पाहता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. मराठी माणूस यूपीत आहे. ओरिसात आहे, बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात आहे. गुजरातमध्ये आहे. त्यांचं काय करायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group