राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार?
राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार?
img
Dipali Ghadwaje
विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. समरजित घाटगे यांना दोनदा ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी समरजित घाटगे यांची ओळख आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांना शरद पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र घाटगे यांनी अद्याप ऑफर स्विकारलेली नाहीये, त्यामुळे येत्या काळात घाटगे तुतारी हाती घेणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटात इनकमिंग 
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर प्रवीण माने यांची देखील चर्चा सुरू झाली आणि आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून समजित घाटगे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group