पण दाऊद... ''या'' नेत्याचे शरद पवारांवर खबळजनक आरोप, वाचा सविस्तर
पण दाऊद... ''या'' नेत्याचे शरद पवारांवर खबळजनक आरोप, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान अशीच एक खळबळ उडविणारी बातमी समोर अली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे . 

प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटलंय. एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘‘मी दिल्लीत होतो, सगळे पत्रकार बसले होते. आमच्याकडे रिपोर्ट आले दंगल आहे. ते म्हणत होते थांबवली पाहिजे. मी म्हणालो फोन करा शरद पवारांना तुमचे मित्र आहेत. थोर नेते आहेत. जाणकार नेते आहेत पण दाऊदचे मित्रही आहेत.’’ अशी परिस्थिती आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

दरम्यान , मुंबईवर १९९३ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी १९९२ मध्ये मंत्रिमंडळातील काही व्यक्ती आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी दुबईत वारंवार संपर्क केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हा आरोप केले होते. पण हे आरोप पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नव्हते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group