आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्या मागचे समीकरणे यामुळे संपूर्ण राजकरनातं राजकीय खेळी बघायला मिळत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी पोहोचले. भोसले नगरमधील प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान , अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आहे.यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि ते ९ तारखेपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, अशी माहिती अजित पवारांना दिली आहे. तसेच , अजित पवार पुढे म्हणाले, आमच्या इतर काही गप्पा झाल्या नाही. या गप्पा अर्ज माघारी घेण्याआधी होण्याची शक्यता असते.पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.