"...तर आम्ही महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू" - प्रकाश आंबेडकर
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीची पडघम लवकरच वाजणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सर्व पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्यात सक्रीय आहेत. नेत्यांचे दौरे, आरोप प्रत्यारोप, पक्षामध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु आहे.

प्रत्येक पक्षाला महाराष्ट्रात आपली सत्ता हवी आहे. अशात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणू असा दावा एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत  केलाय. 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group