इंडिया आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ बीकेसी मैदानावर फोडला. दरम्यान, सभेचा समारोप झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे त्यांच्या गाडीचे चालक आणि शिवसैनिकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. हे पाहून काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जवळपास तीन ते चार मिनिटे हे भांडण सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दोन्ही बाजूकडील तणाव निवळला.
महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच VIP गेटमधून आत सोडलं. मात्र त्यांच्या सोबत आलेल्यांना पोलिसांनी रोखलं. सहकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांना आत सोडण्यास नकार दिल्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे माघारी आले आणि पोलिसांवर संतापले. 'आधी सगळ्यांना आत घ्या, कोण आहे तो? त्याचं नाव घ्या' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि इतर सुरक्षारक्षकांना VIP गेटमधून आत सोडलं.