मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे बाजारात मोठी विक्री दिसून आली. व्यवहार बंद होताना, सेन्सेक्स 930.67 अंकांनी किंवा 1.22 टक्क्यांनी घसरून 75,364.69 वर बंद झाला.
दुसरीकडे, निफ्टी 340 अंकांनी किंवा 1.47 टक्क्यांनी घसरून 22,909.40 च्या पातळीवर पोहोचला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य सुमारे 9.5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. फार्मा, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये गोंधळाची स्थिती आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केल्यानंतर तज्ज्ञांनी बाजारात घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती.
2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी भारतासह संपूर्ण जगासाठी परस्पर शुल्काची घोषणा केली. यानंतर, 3 एप्रिल रोजी सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण दिसून आली, परंतु नंतर बाजार सावरला. पण आज शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’ दिसला.