कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. कपिल शर्मा यांच्या कॅफेवर यावेळी 6 राउंड गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर Surrey पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काही आठवड्यांपूर्वी कपिलच्या याच कॅफेवर बिश्नोई गँगने हल्ला केला होता. त्यामुळे सिद्धू मुसेवालानंतर बिश्नोई गँगने कपिल शर्माला टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशात कॅफेवर हल्ला करण्यात आल्यानंतर कपिल शर्मावर मुंबईत हल्ला करण्याची धमकी देखील देण्यात आलीये. गोळीबारानंतर गोल्डी ढिल्लों नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट व्हायरल होत आहे.
घटनेनंतर Surrey पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका महिन्यातच कॅप्स कॅफेवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. मागील वेळी झालेल्या गोळीबारात तेथील पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.