एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री कांती रेडेकरला पाकिस्तानून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. क्रांतीला पाकिस्तानी क्रमांकावरून अश्लील संदेश पाठवत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाणे गाठत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंद केलीआहे.
क्रांती रेडकरला ८ मार्चला व्हॉट्सअॅपवरून अश्लील भाषेत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी मिळाली. त्यानंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद केली. तिने ब्रिटन आणि पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी मिळाली आहे. क्रांती रेडकरला या आधी देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये क्रांतीला धमकी मिळाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी मिळाली होती. तेव्हा क्रांती रेडकरने तिच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. क्रांती रेडकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रांती रेडकर अभिनयासोबत दिग्दर्शक देखील आहे.
क्रांती रेडकरचे पती एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे दोन वर्षापूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स क्रुझ प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर चर्चेत आले होते.
क्रांती यांनी एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर करत मदत मागितली आहे. या पोस्ट मध्ये अभिनेत्री म्हणाली आहे की, ‘गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. हेच तुम्हाला सांगायचं आहे. याबाबत पोलिसांना नियमितपणे माहिती देण्यात आली आहे.’ अभिनेत्रीने पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.
अभिनेत्रीने पोस्टसोबतच ज्या नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील मेसेज आले होते त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यावर पोलीस पोलिस उपायुक्त आनंद भोईत म्हणाले, ‘आम्हाला एक अर्ज आला आहे. त्याची चौकशी करून पुढील कारवाई करू’ या प्रकरणानंतर सध्या सर्वत्र क्रांतीची चर्चा सुरु आहे.