भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला......
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला......
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. 

त्यामुळे मतदानासाठी आता सेलिब्रिटी देखील घराबाहेर पडत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी सकाळी सात वाजता मदतान केलं. शिवाय इतरांनी देखील मतदान करावं असं आवाहन सेलिब्रिटी करताना दिसत आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं आहे. अशाच प्रमाणे पूर्ण भारताने मदतानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटत आहे, त्या उमेदवाराला मतदान करा. यावेळी मोठ्याप्रमाणे लोकं मतदानासाठी घराबाहेर निघतील. मी सकाळी सात वाजता मतदान केलं आहे. मी मतदान केंद्रावर पोहोचलो तेव्हा जवळपास 500 लोकं होती.’


भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं आहे. यावर देखील अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या आहेत. मला आनंद होत असल्याचं अक्षय कुमार म्हणाला. आज मुंबईत देखील मतदान होत असल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी दिसतील. आता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांना मतदान केंद्राबाहेर स्पॉट करण्यात आलं. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group