''एका वंचित घटकाला न्याय देताना दुसऱ्या वंचितांवर अन्याय झाला नाही पाहिजे''  -  पंकजा मुंडे
''एका वंचित घटकाला न्याय देताना दुसऱ्या वंचितांवर अन्याय झाला नाही पाहिजे'' - पंकजा मुंडे
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे.  राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे मुंबईत येण्यावर अद्याप ठाम आहेत. मराठा आरक्षणाप्रश्नी राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको, असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपलं मत मांडलं आहे. माध्यमांनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मागच्या दोन दशकांपासून मराठा आरक्षणाबाबत मी भूमिका मांडलेल्या आहेत. मी कायम मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतलेल्या आहेत.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मराठा समाजबांधव वंचित आहेत. त्यांना माझ्या पोटातून शुभेच्छा आहेत. परंतु दुसऱ्या वंचितांना त्रास झाला नाही पाहिजे. मी मराठा समाजाच्या मागण्यांच्या सोबतच आहे, असं त्या म्हणाल्या. ''मराठा समाजाला सरकार नेमकं कसं न्याय देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मीदेखील याबाबत उत्सुक आहे.'' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group