सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर......, लक्ष्मण हाकेंचा सरकारला थेट इशारा
सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर......, लक्ष्मण हाकेंचा सरकारला थेट इशारा
img
Dipali Ghadwaje
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली काढणार आहेत. यावेळी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला आहे. सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले, तर मुंबई जाम करू, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात.आम्ही ६० टक्के ओबीसीने तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती देखील हाके यांनी केली आहे. इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्याचा शब्द दिल्याचं मनोज जरांगे सांगत आहेत. त्यामुळे सगेसोयरेंबाबत मुख्यमंत्र्यांना हा अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असताना आता ओबीसी समाजाने दिलेल्या हा इशाऱ्यामुळे सरकार मोठा पेच उभा राहणार आहे

त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकार पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group