मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु
img
वैष्णवी सांगळे
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या . आरक्षणासाठी अनेकांनी प्राणांचंही बलिदान दिलं, अखेर आज यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.  आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणापत्राचे वाटप सुरू करण्यात आले आहे.  

बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला यश मिळल्याची भावना व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत.

 मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचे यश आज पाहायला मिळत असून हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात आज पालकमंत्र्यांच्याहस्ते हे प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत. 

लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रराजे यांच्याहस्ते 2 बांधवांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर, हिंगोली जिल्ह्यात 50 मराठा बांधवांना मराठा-कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र धारकांना दिली आहे. सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group