ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आंदोलकांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध केला. लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासाळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आहे.
त्यामुळे काल ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली, आज या ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. अंबड शहरांमध्ये आज बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी दुकाने बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.
यावेळी आंदोलकांनी सरकारकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असून सरकारची अशीच भूमिका राहिली तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्रीकडे रवाना -
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केला आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाच्या दिशेने निघाले आहेत लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे ओबीसी समाज बांधव हिंगोलीकडे निघाले आहेत