मंत्रीमंडळ बैठकीत : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतले 'हे' धडाकेबाज निर्णय
मंत्रीमंडळ बैठकीत : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतले 'हे' धडाकेबाज निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध भागांसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या या बैठकीत सरकारच्या वतीनं आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय
  • महाराष्ट्र राज्य  सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार  ( वित्त विभाग) 
  • महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार ( सामाजिक न्याय )
  • राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार ( सहकार व वस्त्रोद्योग) 
  • कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग) 
  •  इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार( कामगार विभाग)
  •  बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण ( सामाजिक न्याय) 
  • अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.
  • महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
  • राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार.
इतर बातम्या
Join Whatsapp Group