लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली,  झक मारली आणि पवार कुटुंबाला...
लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, झक मारली आणि पवार कुटुंबाला...
img
दैनिक भ्रमर
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून चांगलेच वादंग उठले आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके यांनी कंबर कसली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी लोकप्रतिनिधीनीवरही टीका केली आहे. पवार कुटुंबियांवर निशाणा साधताना बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली. 

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ , OBC आरक्षणासाठी तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं, अशी घणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून पवार कुटुंबीयांवर केली आहे. ५ सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, याला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लक्ष्मण हाके यांच्यासह आज 14 जण बारामती पोलीस ठाण्यामध्ये आले होते, तेव्हा आम्हाला अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांकडून नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलं असलं तरी यावरून मोठे राजकारण सुरू झाले. लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले असून अजित पवारांच्या सांगण्यावरुनच आम्हाला अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group