देशात नुकतंच लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली. आता सगळ्यांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयार सुरु केली आहे. नुकतंच शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला. त्यानंतर आता शरद पवार पुन्हा बारामती दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार उद्यापासून 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शरद पवार जाणून घेणार आहेत.
दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार 11 शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहेत. याधी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता. त्यानंतर उद्यापासून पवार पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत.
शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली. त्यानंतर आता शरद पवार शेतकरी मेळावे घेणार आहेत.
लोकसभेनंतर शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसतंय.