हृदयद्रावक ! कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; 24 तासात एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू
हृदयद्रावक ! कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; 24 तासात एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
बारामती शहरात रविवारी झालेल्या अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यातून कुटुंब बाहेर येत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा याच कुटुंबात आणखी एका सदस्याचे दुःखद निधन झाले. 

बारामती शहरातील खंडोबा नगर येथील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चिरडले गेले. यात दुचाकी चालकासह त्याच्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. ओंकार राजेंद्र आचार्य यांसह सई आणि मधुरा अशी या तिघांची नावे आहेत. 

बाई काय हा प्रकार...! सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! 'या' ठिकाणी मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

अपघातात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. हे दुःख संपत नाही तर आज सकाळी ओंकार आचार्य यांच्या वृध्द वडिल राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचा देखील मृत्यू झाला.आचार्य यांच्या घरातील 24 तासाच्या आत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक होतं, त्यांना ऑटिझम व शुगर होती, ते बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी आणले होते. त्यांना फळे घेऊन येताना ओंकार आचार्य यांचा अपघात झाला होता. आज पहाटे त्यांचं देखील निधन झालं आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group