सासरच्या लोकांकडून विवाहितांच्या छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यात अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. असाच एक विचित्र प्रकार बारामती तालुक्यात घडला. हुंड्यासाठी विवाहितेचे दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली .
हुंड्यासाठी इतक्या क्रूरपणे सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे.