पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले आणि त्यांना अटकही करण्यात आली. या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचाही समावेश होता. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली.
पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. रोहिणी खडसे यांनी लिहिले की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!
रोहिणी खडसेंचे पती व्यावसायिक असून त्यांचे कामानिमित्त कायमच पुण्याला येणे जाणे सुरू असायचे. पुण्यातील रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनीची केल्याचे सांगितले जातंय. दोन रूम या प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने बूक केलेल्या व्हायरल झालेल्या पावत्यांवरून स्पष्टपणे दिसत आहे.