'कॅप्टन कुल' म्हणजेच महेंद्रसिंह धोनी असं सहज कोणीही सांगेल. मॅचची परिस्थिती काहीही असो मनाचं संतुलन न गमावता शांतपणे परिस्थिती हाताळणे ही धोनीची खासियत. त्याच्या लोकप्रियेतेमध्ये वाढ करणारा हा एक्स फॅक्टर. त्यामुळे धोनी काही कारणामुळे मैदानावर संतापला तर ती अतिशय विशेष गोष्ट ठरते.
चेन्नई सुपर किंग्स टीमचा चार वर्ष सदस्य असलेला भारतीय फास्ट बॉलर मोहित शर्मानं एका मुलाखतीमध्ये महेंद्रसिंग धोनी चिडल्याचा आणि शिव्या दिल्याचा किस्सा सांगितला आहे. मोहितनं सांगितलं की, 'चॅम्पियन्स लीग T20 च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध, 'माही'ने ईश्वर पांडेला गोलंदाजी करायला बोलावले, पण मला वाटले की त्यांनी मला बोलावले.
मी रन-अप सुरू केल्यामुळे मलाच बॉलिंग करावी लागली. त्यामुळे ते माझ्यावर रागवले. त्यांनी मला शिवीगाळ केली. मी पहिल्याच बॉलवर युसूफ पठाणची विकेट घेतली. त्या विकेटचे सेलिब्रेशन करतानाही 'माही भाई' मला शिवीगाळ करत होते , असे मोहितने हसत-हसत सांगितले.