उद्घाटनाच्या सामन्याची तिकीट विक्री झाली सुरू, जाणून घ्या कसं करायचं ऑनलाईन बुकिंग
उद्घाटनाच्या सामन्याची तिकीट विक्री झाली सुरू, जाणून घ्या कसं करायचं ऑनलाईन बुकिंग
img
Dipali Ghadwaje
आयपीएलच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली आहे. जर तुम्ही महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहलीचे चाहते असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

आयपीएल 2024 कधीपासून होणार सुरू ?
इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम हा 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे.

आयपीएल सामन्यांचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठीच्या काही निवडक वेबसाईट


BookMyShow : 

याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बुक करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या 

https://www.chennaisuperkings.com/bookings/tickets  या वेब साईटवर देखील तुम्ही भेट देऊ शकता.

ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर प्रिंट काढणं गरजेचं आहे?
आयपीएल सामन्यांसाठी ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जवळ असणं गरजेचं नाही. तिकीट ऑनलाईन बुक केल्यांनतर चाहत्यांना इ-तिकीट मिळणार आहे. दे दाखवून स्टेडियममध्ये प्रवेश मिळवता येईल.

यंदाच्या हंगामात सालाबादप्रमाणे गतविजेत्या आणि उपविजेत्या संघात सामना होणार नाही. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना होणार आहे. हा सामना शुक्रवारी 22 मार्चला सायंकाळी 7.30 ला सुरू होईल. चेन्नई आणि आरसीबीचा सामना हा चेन्नईचे होम ग्राऊंड चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
IPL | ticket | CSK | RCB |
इतर बातम्या
Join Whatsapp Group