आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला 3.6 कोटी रुपये देऊन विकत घेतले होते.
21 वर्षीय रॉबिन मिन्झ बाईकवरून जात असताना त्याचा अपघात झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिन्झ त्याची कावासाकी सुपरबाईक चालवत असताना नियंत्रण सुटून तो दुसऱ्या बाईकला जाऊन धडकला.
मात्र, रॉबिनला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. मिन्झची प्रकृती गंभीर नसून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून मिन्झच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.