सोमवारी झालेल्या सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये रवींद्र जादेजाने सामन्यात १८ चेंडूत ३ विकेट घेत दमदार कामगिरी केली. चेपॉकवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाला चेन्नईने अवघ्या १३७ धावांवर रोखले, जडेजाच्या ३ विकेट्सने संघाच्या विजयाचा पाया रचला.
सीएसकेने आपल्या घरच्या मैदानावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. जादेजाच्या या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासह आता धोनी आणि जादेजा या दोघांकडे ऐकून १५ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चे पुष्कर आहेत.
या सह सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाकडे ही १२ ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चे पुरस्कार आहेत. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे ऐकून १० ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार आहेत. जडेजाच्या या शानदार कामगिरीचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.
सामन्यामध्ये जादेजाने केकेआरच्या फलंदाज सुनील नरीन, अंगक्रिश रणघुवंशी आणि वेंकटेश अय्यर यांचे विकेट्स घेतले. पुरस्कारासह जादेजाला सीएसकेने एक विशेष नवं नावही दिलं ते म्हणजे क्रिकेट थालापती.