इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामासाठी सर्व संघ सुसज्ज होत आहे. गेल्या आठवड्यात सर्व संघांनी रिलीज आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या याद्या जाहीर केल्या.
अनेक बड्या खेळाडूंना फ्रँचायझीने बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच अनेक खेळाडूंची आपापसात खरेदी-विक्री झाली. रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतर, सर्व फ्रँचायझींनी या महिन्यात 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी लिलावाची तयारी सुरू केली आहे.
दुबई येथे होणाऱ्या या मिनी लिलावात एकूण 1166 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. यात शेकडो भारतीय आणि परदेशी खेळाडूंसह अनेक सुपरस्टार्सचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्व फ्रँचायझी करोडो रुपयांची बोली लावतील.
हार्दिक पांड्याने गुजरातचा कॅप्टन असूनही मुंबईचा रस्ता पकडल्याने बरीच चर्चा झाली. मुंबईने त्याला रोख रक्कम मोजत खरेदी केल्याची चर्चा आहे. यासाठी 15 कोटी मोजल्याची सुद्धा चर्चा आहे.
यामुळे गुजरातची कमान टीम इंडियाचा प्रिन्स गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलकडे गेली आहे. गिल अवघ्या 24 वर्षांचा आहे. त्यामुळे ज्याच्याकडे टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून पाहिलं जात आहे, तो या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असेल.
दुसरीकडे, या आयपीएलमध्ये खेळण्यावर धोनीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तो नेहमीप्रमाणे चेन्नईचा सेनापती असेल. धोनी सध्या 42 वर्षांचा असून तो आयपीएलमधील सर्वात वयस्कर कॅप्टन असेल. याच धोनीसमोर गिलची प्रतिभेचा कस लागणार आहे. इतकंच नव्हे, तर धोनी यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि गिलविरुद्ध कॅप्टन असेल. त्यामुळे तिसरी पिढी धोनीसमोर असणार आहे.
या भारतीय खेळाडूंवर बोली लावली जाणार
दुसरीकडे, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी या मिनी लिलावात एकूण 830 भारतीय खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. त्यात शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, उमेश यादव, मनीष पांडे, वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर सरन, जयदेव उन्नाद, जयदेव उनाड यांचा समावेश आहे. हनुमा विहारी आणि संदीप वॉरियर सारख्या कॅप्ड खेळाडूंसह अनेक तरुण प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे.
या परदेशी खेळाडूंवर बोली लावली जाणार
या मिनी लिलावात केवळ भारतीय खेळाडूच नाही तर परदेशी सुपरस्टार्सवरही करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे. या लिलावासाठी एकूण 336 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यात ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, डॅरिल मिशेल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद, डेव्हिड मलान आणि टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, बेन डकेट, फिलिप सॉल्ट, टॉम बॅंटन आणि सॅम यांसारखे अनेक परदेशी सुपरस्टार्स आहेत.