आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर
आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर
img
दैनिक भ्रमर
आयपीएलच्या नव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल 2024 ला येत्या 22 मार्चपासून सुरु होणार आहे.

पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईत खेळवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, दुसऱ्या टप्प्यातील शेड्युल लोकसभा निवडणुकांच्या तारखांनंतर जाहीर होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 22 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान 21 सामने खेळवले जाणार आहेत.


आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामान 24 मार्चला अहमदाबादमध्ये होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी संध्याकाळी हा सामना खेळवला जाईल. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला लखनऊ विरुद्ध गुजरात हे दोन्ही संघ भिडणार आहेत.


cricket | IPL |
इतर बातम्या
Join Whatsapp Group