आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत. परंतु चेन्नईच्या तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना धोनीची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने मैदानात चौकार-षटकारांचा वर्षाव केला. याचदरम्यान, महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी लंगडताना दिसत आहे. धोनीचा लंगडताना व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
धोनीचा गेल्या दोन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार धोनी लंगडताना दिसत आहे. चेन्नईच्या तिसऱ्या सामन्यानंतरचा व्हिडिओ असल्याचा माहिती मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये धोनीच्या स्नायूमध्ये दुखापत झाल्याचे दिसत आहे. तसेच त्याने त्या भागावर आइस कॅप लावल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीला चालतानाही अडचणी येत आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. चाहत्यांना महेंद्र सिंह धोनीकडून खूप अपेक्षा असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.