सलग सहाव्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
सलग सहाव्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
img
Dipali Ghadwaje
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केलेय. चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु आहे. अशातच पाणी आणि अन्नाचा पोटात कणही गेला नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. 

दरम्यान त्यांना उपोषण स्थळावरून खाली उतरताना चालताही येत नव्हते. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची डॉक्टरानी विनंती केली होती, मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. 

यावेळी तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत का? मनोज जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना झापले. डॉक्टर सुद्धा सरकारच ऐकून आमचा गेम करायला लागले का ? माझी तब्बेत मेंटन असल्याची खोटी माहिती तुम्ही सरकारला देतायत. माझी शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी? असे म्हणत मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना धारेवर धरले.

आज दुपारी मनोज जरांगेंच्या उपाचारासाठी डॉक्टरांचे पथक आले होते. यावेळी जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना चांगलंच झापलंय. माझी शुगर उपोषणाला बसताना 70 होती मग शुगर 83 कसं झाली? असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी वैद्यकीय पथकाला जाब विचारला. तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत का असा सवालही यावेळी जरांगे यांनी डॉक्टरांना विचारला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group