राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकला लागला आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत फक्त एकच अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. जुन्नर तालुक्यातील अपक्ष उमेदवार शरद सोनावणे निवडून आले आहेत.शरद सोनावणे जवळपास ७००० मतांनी निवडून आले आहे. शरद सोनावणे निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले आहे.
शरद सोनावणे हे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात महायुतीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर उभे होते. त्यांनी ७ हजारांची लीड मिळवून विजय मिळवला आहे.
शरद सोनावणे हे शिंदे गटात होते. परंतु अतुल बेनकेंना उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. दरम्यान, त्यांनी विजय मिळवला आहे. शरद सोनावणे २०१४ साली मनसेमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची साथ दिली. त्यांनी २०१४ च्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांंच्या जोरावर मते मागितली होती.
शरद सोनावणे यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी हेलिकॉप्टर पाठवले आहे. त्यामुळे आता शरद सोनावणे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अपक्ष उमेदवाराला घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवणार असल्याचे दिसत आहे.