सत्ता स्थापनेनंतर महायुतीमध्ये नाराजीचे असल्याच्या चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू झाली आहे. तर, काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे म्हटले जात होते. आता अधिवेशनात आता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष हा धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, राज्यातील शेती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरही विरोधक आक्रमक होणार आहेत. अशातच या विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.