विधानसभा निवडणुकीपासून ठाकरे गटाला सुरू झालेली गळती अजूनही सूरूच असून आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं असून, आज शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पूर्व विदर्भात शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेसफूल झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं असून, आज शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांनी विदर्भात ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतरे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख दिपक बेले, यांच्यासह वर्ध्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल देवतारे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमधील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोबतच शिवसेनेनं मनसेला देखील धक्का दिला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरासकर यांच्यासह नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.