देवळाली दारणा काठच्या लोहशिंगवेत नर बिबट्या पिंजराबंद
देवळाली दारणा काठच्या लोहशिंगवेत नर बिबट्या पिंजराबंद
img
वैष्णवी सांगळे
देवळाली  कॅम्प : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवेत वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी तात्पुरता विश्वास टाकला आहे.  अद्यापही या भागात बिबटे मोकाट फिरत असल्याने त्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोहशिंगवेत येथील जगन्नाथ बापुराव पाटोळे यांच्या मळ्यातील गट क्रमांक ३१ मध्ये आठ दिवसांपूर्वी वन खात्याने पिंजरा लावला होता त्यातील सावध टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगत जाळ्यात फसला. बिबट्याने केलेल्या सुटकेच्या प्रयत्नात परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी तातडीने वन अधिकारी यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली तसेच याबाबतची माहिती गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी  नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनाधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे,अंबादास जगताप यांनी घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेत नाशिक येथील गंगापूर रोपवाटिका मध्ये हलवण्यात आला.

Nashik : विवाहबाह्य संबंधातुन पतीला होता मुलगा; पीडितेने "अशी" केली पतीच्या कृत्याची पोलखोल

लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांना घरच्या काही अंतरावर असलेल्या पिंजऱ्याचा  पहाटे ५.३० वाजता धडधड आवाज येत होता जवळ जाऊन बघितले तर त्यात बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचे दिसले त्यांनी तत्काळ वनाधिकाऱ्यांना कळवले.
जगन्नाथ पाटोळे प्रत्यक्षदर्शी शेतकरी लोहशिंगवे 

 नाशिक तालुक्यातील दारणा काठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नित्याचाच झाला असून सोमवारी नर बिबट्या जेरबंद झाला असला तरी जवळपासच्या लहवित, लोहशिंगवे, नाणेगाव, देवळाली कॅम्प, गोडसे मळा, आर्टिलरी सेंटर, गांधीनगर, गवळाने आदी ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे -
विजयसिंह पाटील वनअधिकारी 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group