महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? आघाडीत नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? आघाडीत नेमकं काय घडतंय?
img
DB
राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.  विधानसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा होत आहे.

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये विदर्भ, नागपूर आणि सांगोल्याच्या जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीमधून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वादामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने सर्वच जागा लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने बैठका करून आपली तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार आहे. आले तर सोबत नाहीतर शिवाय असं विधानसभेला आक्रमक रित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे.  
 
 तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,   उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जवळकी वाढली आहे. संजय राऊत आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाल्याचा दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group