राज्यात भाजप स्वबळावर जिंकू शकत नाही, पण.... नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यात भाजप स्वबळावर जिंकू शकत नाही, पण.... नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
img
Dipali Ghadwaje
आगामी विधासभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. एवढंच नव्हे तर प्रचारादरम्यान अनेक दावेही केले जात आहेत.

मात्र याचदरम्यान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही, असे विधान त्यांनी नुकतंच केलंय, मात्र निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही, मात्र या निवडणुकीनंतर आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ. आमच्याकडे सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे हे खरं आहे.

एका वृत्त वहिनीला मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केलं. ‘ खरं काय आहे, नेमकी परिस्थिती काय आहे, याबद्दल आपण व्यावहारिक असलं पाहिजे. ज्यांना या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही त्या नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी याबद्दलही फडणवीस बोलले. आमच्या पक्षातील काही महत्वाकांक्षी नेत्यांना यावेळी तिकीट मिळू शकलं नाही, उमेदवारी देता आली नाही, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं’, असंही ते म्हणाले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group