उद्या राज्यभरात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्ववभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. याच धर्तीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एक आवाहन वाहन केलं आहे. मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल, असं न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
तसेच , ते पुढे म्हणाले की , मराठ्यांनी एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये. मी कोणालाही काही सांगितले नाही आणि शेवटपर्यंत सांगणार नाही. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, ते म्हणाले मी लोकसभेला सांगितले होते, कोणाला पाडायचे त्याला आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, आणि विधानसभेला पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.