विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून, पक्षातल्या इनकमिंग , आउटगोइंग ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा निरोप घेत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला परंतु आता त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील कोणत्या दिवशी पक्षप्रवेश करणार आहेत याची माहिती दिली आहे.
‘राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.