नाशिक , दि . २२ ( भ्रमर प्रतिनिधी ) :मतदान झाल्यापासून प्रत्येक जण एकमेकाला एकच प्रश्न विचारत आहे , तो म्हणजे ; ' का हो काय वाटते तुम्हाला ? 'अर्थात हा प्रश्न विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चारही मतदारसंघात तसेच जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात कोण निवडून येईल ? राज्यात कोणाची सत्ता येईल ? याची चर्चा सुरू असून एकमेकाला असे प्रश्न विचारत अंदाज व्यक्त केला जात आहे , तसाच स्वतःचा देखील अंदाज सांगितल्या जात आहे.
चौका चौकात , कट्ट्यावर ,ऑफिसमध्ये आणि घरोघरी ही चर्चा सुरू आहे . विधानसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे आता सामान्य नागरिकांसह राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रत्येक सामान्य नागरिकांपासून ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून अंदाज वर्तविण्यात येत असून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहेत, त्यामुळे सद्या शहरातील चहा टपरीपासून ते शासकीय कार्यलयापर्यंत ते बस स्टॉपासून जॉगिंग ट्रॅकपर्यंत नागरिकांकडून २३ नोव्हेंबरला राज्यात कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार आहे? कोण मुख्यमंत्री होणार? यासह राज्यात महाविकास आघाडीच्या जागा किती येणार? महायुतीच्या जागा किती येणार ? यासह नाशिक शहरातील चार मतदार संघात कोण निवडूण येणार तसेच जिल्ह्यातील इतर अकरा मतदार संघात कोण बाजी मारणार ? याची जोरदार चर्चा आता रंगली आहे .
विशेष म्हणजे प्रत्येक जण उमेदवाराच्या विजयाचे गणित सांगत जण अंदाज बांधण्यात येत आहेत. त्यामुळे आता शहरात निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असून आता २३ नोव्हेंबर चि सर्वाना प्रतीक्षा लागली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालातून आगामी महानगरपालिका निवडणूकीचे आडाखे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभा निकालावर विधानसभेच्या उमेदवाराचे नाही तर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने निकाला काय लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.