येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधासभा निवडणूक पार पडणार असून राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळेंना सलग 4 दिवस सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर अहेत. त्यामुळे अनेक शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा चालविणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत शाळांना विनंती पत्र पाठवलं आहे.
ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे त्या शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना तसं विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. पण शाळेला सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्या त्या शाळेला घ्यायचा आहे. अर्थात ज्या शाळांकडून सुट्टी जाहीर केली जाणार त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना 18,19 आणि 20 नोव्हेंबरची सुट्टी तर मिळणारच यासोबत 17 नोव्हेंबरला रविवार असल्याने सलग चार सुट्ट्या मिळणार आहेत.
. “18, 19,20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या”, असं विनंती पत्र राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना पाठवलं आहे.