आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे. नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून माजी आमदार योगेश घोलप हे निवडणूक रिंगणात असणार आहेत. गेल्यावेळेस त्यांचा सरोज अहिरे यांनी पराभव केला होता.
शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत खालील उमेदवारांचा समावेश :
१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
४) बुलढाणा- जयश्री शेळके
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) -योगेश घोलप
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२ ) शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.