राजकीय बातमी !  शिवसेनेच्या सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
राजकीय बातमी ! शिवसेनेच्या सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून राजकारणातील हालचालींना चांगलाच वेग आला आहे. राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करण्याचा तयारीत आहेत दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेने मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. 

शिवसेनेच्या आमदारांना ‘वर्षा’ बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र काही जागांवर तिढा अद्यापही काही आहे. 

दरम्यान , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांना उद्या संध्याकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: आमदारांना एबी फॉर्म देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी ही आज जाहीर होईल आणि दुसरी यादी 26 ऑक्टोबरला जाहीर होईल, असं सांगितलं होतं. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group