भाजपला धक्का !  पवारांची बाजी,  ''हा'' बडा नेता तुतारी हाती घेणार
भाजपला धक्का ! पवारांची बाजी, ''हा'' बडा नेता तुतारी हाती घेणार
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींचा वेग आला आहे . निवडणुकीच्या आधी राजकारणात डावपेचांचा खेळ चांगलाच रंगला आहे. पक्ष आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करणाच्या तयारीत असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपला धक्का देत शरद पवारांनी मोठी बाजी मारली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षव र्धन पाटील हे भाजपचे कमळ सोडून पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार आहेत. हर्षवर्धन यांच्या सीमोल्लंघनामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी 

हर्षवर्धन पाटील यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

दरम्यान,  येत्या दोन दिवसात हर्षवर्धन पाटील आपला अधिकृत निर्णय जाहीर करणार आहेत. हर्षवर्धन पाटील तुतारीकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे दत्ता भारणे आमदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या इंदापूर विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group