आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ''या''  पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश
आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ''या'' पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकारणातील घडामोडींना  आला असून, नेत्यांचे पक्षांतराच्या खेळी ह्या सुरूच आहेत. दरम्यान,  वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 

शिवसेना शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा प्रमुख श्रीकांत जावळे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अन्वर दुर्रानी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आहे.

दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्यावर प्रेम करणारे लोक हे पुन्हा एकदा आमच्यासोबत येत आहेत. तुमची निराशा होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो. येणाऱ्या सरकारमध्ये तुमचा निश्चित हातभार लागेल असं मला वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group