राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकारण तापले असून घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत अडचणीत आले आहेत. सुनील राऊत यांनी महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात महायुतीच्या वतीनं विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विक्रोळी विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून सुवर्णा करंजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुनील राऊत यांनी सुवर्णा करंजे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. सुवर्णा करंजे यांच्याबाबत करण्यात आलेल्या विधानाचा निषेध महायुतीकडून करण्यात आता. तसेच याप्रकरणी सुनील राऊत यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुनील राऊत यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे अशाप्रकारे महिलांबाबत वक्तव्य करण्याचे काम त्यांनी केलेल आहे. राऊत यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे.