'मरणाने केली सुटका'... इच्छा-मृत्यूची संमती मिळालेल्या हरीश राणाचे एम्स रुग्णालयात निधन
'मरणाने केली सुटका'... इच्छा-मृत्यूची संमती मिळालेल्या हरीश राणाचे एम्स रुग्णालयात निधन
img
वैष्णवी सांगळे
कधी कधी जगणं एवढं असह्य होऊन जातं की मरणाने आता सुटका करावी असे वाटू लागते.  हरीश राणाचे देखील काहीसे असेच झाले. इच्छा-मृत्यूची संमती मिळालेल्या हरीश राणाचे एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. त्याला होत असलेल्या त्रासाची जणू मरणाने सुटका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून इच्छामृत्यू (पॅसिव्ह युथेनेशिया)ची परवानगी मिळालेल्या गाझियाबाद येथील हरीश राणा यांचे अखेर दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. पॅसिव्ह युथेनेशिया प्रक्रियेअंतर्गत डॉक्टरांच्या देखरेखीखाली मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे अन्न-पाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोमात राहिल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.



हरीश राणा यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये (आयआरसीएच) दाखल करण्यात आले होते. त्यांना पॅलिएटिव्ह केअर वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. २३ मार्च रोजी डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाऊ शकते. यानंतर गेल्या आठवड्यापासून हरिश राणा अन्न आणि पाण्याशिवाय जगत होते. ही प्रक्रिया सहा दिवसांपासून सुरू होती.

नेमकं प्रकरण काय?
जुलै २०१० मध्ये, हरीशने चंदीगड विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. २०१३ मध्ये तो अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. दरम्यान, ऑगस्ट २०१३ मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी, मोबाईल फोनवर आपल्या बहिणीशी बोलत असताना, तो त्याच्या पीजीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या हरीशला तात्काळ चंदीगडच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. नंतर, डिसेंबर २०१३ मध्ये, त्याला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला क्वाड्रीप्लेजिया (चतुरांगघात) झाल्याचे निदान केले.

या स्थितीमुळे त्याचे हातपाय पूर्णपणे निकामी झाले, ज्यामुळे त्याला उर्वरित आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहावे लागले. हरीशच्या असह्य वेदना आणि शारीरिक अपंगत्वामुळे, त्याच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात इच्छामरणासाठी अपील केले, जे ८ जुलै २०२५ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर, कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जवळपास आठ महिन्यांनंतर, ११ मार्च २०२६ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने हरीशला निष्क्रिय इच्छामरणासाठी परवानगी दिली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group