व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदान पावत्या आणि ईव्हीएममध्ये जमा एकूण मतांची पडताळणी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी काही निर्देश देण्याची शक्यता आहे.
न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने 18 एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्देश देणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.