शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणी लांबणीवर; तीन आठवड्यांनी होणार सुनावणी
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणी लांबणीवर; तीन आठवड्यांनी होणार सुनावणी
img
Dipali Ghadwaje
 नवी दिल्ली : महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेल्या शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल आज युक्तिवाद झाला. पण यावर सुनावणी तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. 3 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी  झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  

निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. 

पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर बुधवारी किंवा गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि चिन्हासंबधीची सुनावणी नवरात्र, दसरा यांच्या सुट्या आहेत त्यामुळे नोव्हेंबरमध्ये यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र  ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून तीन आठवड्यानंतर होणर आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group