धक्कादायक : शेतकऱ्यांना चक्क बनावट खताची विक्री ; खत विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल
धक्कादायक : शेतकऱ्यांना चक्क बनावट खताची विक्री ; खत विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल
img
DB
हिंगोली : खरीप हंगाम सुरु झाला असून खत, बियाणे खरेदी सुरु झाली आहे. यात काही विक्रेत्यांकडून बनावट बियाणे, खतांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार हिंगोलीमध्ये बोगस खतांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत गोडावून सील करत खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , खतांचा साठा बनावट असल्याचे समजताच हिंगोली शहरात खत विक्रेत्याचा गोडाऊन सील केला आहे.

दरम्यान या प्रकारानंतर बळीराजाची फसवणूक करू पाहणाऱ्या हिंगोली शहरातील खत विक्रेत्याविरोधात थेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या खत विक्रेत्याने बोगस खताची किती शेतकऱ्यांना विक्री केली याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी घेत आहेत.

थेट परवाना रद्दची करणार कारवाई

कृषी विभागाकडून संपूर्ण चौकशी करत कृषी केंद्राचा परवाना देखील रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group