महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज सोमवार 5 मे 2025 रोजी जाहीर झाला. 11 वाजता निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
राज्यात 11 फेब्रुवारी ते मंगळवार,18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी 8,10,348 मुलं, 6,94, 652 मुली तर 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षेसाठी बसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही केंद्रांवर गैरप्रकार झाले त्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्ग प्रकरण होतील, त्या केंद्राची मान्यता यापुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असे आधीच जाहीर करण्यात आले होते. यावर्षी मार्च 2025च्या 12 वीच्या परीक्षेमध्ये 124 केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे आढळले आहेत.
त्यामुळे नियमानुसार, त्याची चौकशी करून कशी करून ही केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षेपूर्वीच निर्णय घेतला होता. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे गोसावी यांनी जाहीर केलं असून त्यामुळे कॉप्या आढळलेल्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका बसला आहे.
परीक्षेच्या कालावधीत 124 केंद्रांवर 364 -366 कॉपी केसेस समोर आल्या, तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी स्पष्ट केलं.
परीक्षा काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी 281 भरारी पथके तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनातील भरारी पथकेही होती. त्यामुळे अनेक गैरप्रकार रोखले गेले, असेही गोसावी यांनी नमूद केलं.
कुठे कुठे झाली कॉपी ?
पुण्यात 25 केंद्रावर 45कॉपी प्रकार झाले
नागपूरमध्ये 19 केंद्रावर 33 कॉपी केसेस झाल्या
संभाजीनगर 44 केंद्रावर 214 कॉपी केसेस
मुंबई – 5 केंद्रावर 9 केसेस
कोल्हापूरमध्ये 3 केंद्रावर 7 कॉपी केसेस झाल्या
अमरावती 10 सेंटरवर 17केसेस
नाशिक 6 सेंटरवर 12कॉपी केसेस
लातूर मध्ये 11 सेंटरवर 29 कॉपी केसेस
कोकणात एका सेंटरवर 1 कॉपी केस
124 सेंटरवर कॉपी केसेस झाल्या. 124 सेंटरची मान्यता चौकशीनंतर नियमानुसार रद्द करण्यात येणार.
चिटिंग केसेस एफआयआर
तर काही केंद्रांवरील चिटिंग केसेस प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आल्या होत्या. त्याची माहिती खालीलप्रमाणे –
पुणे- 2 संभाजीनगर -7 मुंबई – 2 एकूण – 11